Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

Update: 2020-05-19 12:59 GMT

भाजपने राज्यात विधानपरिषद निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर करत खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे यासारख्या दिग्गज आणि निष्ठावंतांचा पत्ता कट केला आणि वंचित बहुजन आघाडीमधून आलेल्या गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीतून आलेल्या रणजित सिंह मोहिते पाटील यांना संधी दिली. तसंच राज्याला फारसे परिचित नसलेले आणि गडकरी यांचे निकटवर्तीय प्रविण दटके यांना उमेदवारी दिली. ऐनवेळेला डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले रमेश कराड यांचा डमी असलेला अर्ज पक्षाने अचानक अधिकृत केला आणि रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

मात्र, सगळ्या घडामोडींमध्ये पंकजा मुंडे यांचं तिकिट फिक्स मानलं जात असताना पंकजा यांना उमेदवारी नक्की का नाकारण्यात आली? या सवाल आजही कायम आहे. या संदर्भात आम्ही भाजप आमदार सुरेश धस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी काय उत्तर दिले पाहा...

Full View

Similar News