डाव फसला! -निखिल वागळे

Update: 2020-05-01 13:00 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानपरिषदेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेला घटनात्मक पेच सोडवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी तात्काळ मतदान घ्यावं अशी विनंती या पत्रात केली होती.

त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा बैठक घेतली. आणि या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात निवडणूका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान या चर्चे अगोदर आज उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांची सकाळी भेट घेतली. आणि या भेटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्रीय आयोगानं आज महाराष्ट्रातील 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. मात्र, हे सगळं होत असताना पडद्यामागं नक्की काय घडलं? नक्की पाहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं विश्लेषण

Similar News