बोगस बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून सुमोटो याचिका

Update: 2020-06-28 07:39 GMT

राज्यात ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. सोयाबीनच्या पिकावर मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यात सोयाबीन चं मोठ्या प्रमाणात बियाणं बोगस आढळल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलं आहे.

विशेष बाब म्हणजे सरकारच्या महाबीज कंपनीचं बियाणंही बोगस असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र सारख्या माध्यमांनी शेतकऱ्यांचा आवाज होऊन वृत्त प्रसारीत केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या वृत्तांची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

बोगस बियाणांचं उत्पन्न करणाऱ्या कंपन्या हे बियाणं बाजारात विक्री करणारे व्यापारी यांच्या विरोधात बियाणे निरीक्षकांकडे तक्रार देऊन जर कारवाई झाली नाही. तर या कंपन्यांच्या विरोधात पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी. व्ही. नलावडे आणि न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी दिले आहेत.

Full View

Similar News