अल्टिमेटम द्यायला आम्ही अतिरेकी नाही, एसटी कर्मचारी संपावर ठाम

Update: 2022-04-01 13:31 GMT

कामावर या अन्यथा कडक कारवाई होईल असा अल्टीमेटम रिवहन मंत्री अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिला होता. त्यानुसार या संपकरी कर्मचाऱ्यांनी एक एप्रिल रोजी कामावर हजर होणे अपेक्षित होते. पण आता एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम फेटाळून लावला आहे. अल्टीमेटम हा दहशतवाद्यांना दिला जातो आम्ही या देशाचे नागरिक आहोत, असे उत्तर या कर्मचाऱ्यांनी दिले आहे. संपूर्ण एस.टीचे विलीनीकरण होत नाही तोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरूच राहील, असा पवित्रा एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Full View
Tags:    

Similar News