मुख्यमंत्री सहायता निधी त्वरीत सुरू करावा- आदेश बांदेकर

Update: 2019-11-17 12:40 GMT

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संकटात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री सहायता निधी लवकरात लवकर सुरु करावा असं सोशल मीडियावर ट्वीटदेखील केलं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील राज्यपालांना भेटून सहायता निधी कक्ष सुरु करावा असं निवेदन दिलं होतं.

मुंबईत गेल्या दोन वर्षात 15000 पेक्षा अधिक रुग्णांना सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टकडून 32 कोटींची मदत करण्यात आली आहे. 15000 पेक्षा अधिक रुग्णांचे आर्थिक मदतीसाठी फॉर्म हे सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट कडे येत आहेत. परंतु मोठ्या रकमेच्या स्वरुपात रुग्णांना मदत करणं शक्य होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष लवकरात लवकर सुरु करावा अशी प्रतिक्रिया सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर(Aadesh Bandekar) यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली.

Full View

Similar News