VIDEO: सांगलीला पुन्हा पावसाचा तडाखा, रस्ते, पीकं पाण्याखाली

Update: 2020-10-15 10:45 GMT

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या वर्षी महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या सांगली जिल्ह्यात यंदाही पावसाने मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. येरळा नदीवरील बहुतांश पूल पाण्याखाली गेलेले आहेत. खानापुर तालुक्यातील वाझर बलवडी येथील येरळा नदीवरील पूल पाण्याखाली आहे. तासगाव शहरातील सखल भागात पाणी साचलेले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या जत आटपाडी या तालुक्यांमध्ये माणगंगा नदी च्या पुलावरून पाणी आलेले आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. ज्वारी बाजरी, भुईमूग या कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून साठवून ठेवलेली कणसे पाण्याने भिजली आहेत. ऊसाचे फड पाण्याच्या प्रवाहाने आडवे झालेले आहेत. शेतकऱ्यांचे या पावसाने अतोनात नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Tags:    

Similar News