समृद्धी महामार्ग उठला शेतकऱ्यांच्या जिवावर?

Update: 2019-12-16 12:10 GMT

नागपूर ते मुबंई समृद्धी महामार्गाचे काम सध्या जोरात चालू आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव ते पिंप्री पोच्छा शिवारातील चँनेज नंबर १५० ते १६८ पर्यंत उपाध्याय कंन्ट्रक्शन कंपनी या महामार्गाचं काम करीत आहे. या कंपनीने मुरुमासाठी पिंप्री (पोच्छा) या शिवारात शेत घेतलं आहे. पाणंद रस्त्याने जात असताना पाणंद रस्त्याच्या वरुन विजेच्या खांब्याची तार गेलेली आहे. त्या रस्त्याने उपाध्याय कंपनीच्या मुरुम वाहक डंपरने मौजा पिंप्री (पोच्छा) अंतर्गत येत असलेल्या पाणंद रस्त्याच्या मधोमध उपाध्याय कंन्सट्रक्शन कंपनीच्या डंपर चालकाने नशेच्या भरात विजेच्या खांब्याखाली बाजुतून डंपर नेत असताना हायड्रोलिक खाली न करता भरधाव वेगाने नेत विजेच्या खांब्याला धक्का लागल्याने विजेची तार तुटून शेतात पडली.

त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात ही लघुदाब तारेची खांब उभ्या असलेल्या तुरीच्या पिकात पडल्याने पिकांच नुकसान झालं आणि तसचं ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान झालं आहे. याबाबत पापळ येथील “अभियंता शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन बोलण्यास टाळाटाळ केली,” यावरुन असं समजते की उपाध्याय कंन्स्ट्रक्शन कडून काही रसद तर पुरविली जात नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तारे पडली, त्यांनी उपाध्याय कंन्ट्रक्शन कंपनीच्या राहूल सिंह यांना विचारणा केली असता कंपनीने पोसलेल्या लोहोगाव येथील दोन गाव गुंडांना पाठवून शेतकऱ्यांना धमकावण्याची व मारण्याची धमकी दिली. या कंपनीने ‘पोळा’ सणाच्या वेळेस विजेची तार तोडल्याने, त्यात अविनाश पोले यांच्या बैलाचा विद्यूत तारांना स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. सुदैवाने दोन व्यक्तीचे प्राण वाचले. त्यावेळी पापळ येथील अभियंता शर्मा यांनी कंपनीवर कारवाई करण्याचे सुतोवाच केले होते परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने उपाध्याय कंन्ट्रक्शन कंपनीची हिंमत वाढली व त्यांनी पुन्हा विद्यूत तारं तोडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांच नुकसान केलं. परंतु कोणी त्याठिकाणी गेले नसल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली.

यावरुन असे दिसून येते की, पापळ येथील अभियंता शर्मा हे कंपनीच्या पाठीशी आहेत की काय? हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. पोळ्याच्या दिवशी आणि आता झालेल्या घटनेची सखोल चौकशी महावितरण यांनी करावी अन्यथा आंदोलनाचा इशाराही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. तसचं उपाध्याय कन्स्ट्रक्शन कंपनीने पोसलेल्या व शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या त्या गावगुंडांची पोलीस प्रशासनाने दखल घेऊंन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

Full View

Similar News