इथं मंत्रीपदाचं वाटप नाही आणि मंत्र्यांची केबिनसाठी रस्सिखेच

Update: 2019-11-30 07:56 GMT

आज विधानसभेचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनात बहुमत ठराव होणार असून नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. पण त्याधीच महाराष्ट्र (Maharashtra) विकास आघाडी सरकारच्या पहिल्याच दिवशी शिवसेना(Shivsena) -राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये दालनांवरून स्पर्धा सुरू झाली आहे.

माजी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांच्या मंत्रालयातील दालनाचा शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल दुपारी ताबा घेतला. एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते सकाळीपासूनच या दालनाचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही हीच केबिन हवी होती. भुजबळांची टीम दालनाचा ताबा घेण्यासाठी तिथे गेली. पण त्याआधीच शिंदेंची टीम दालनात होती आणि त्यांनी दालनाची चावी स्वतःकडे घेतलेली होती. त्यामुळे भुजबळ समर्थकांना रिकामी हाताने परतावे लागले.

सार्वजनिक बांधकाम खातं मिळावं ही प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते. अजून विश्वासदर्शक ठरावही झालेला नाही. तरी इकडे शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये केबिनसाठी स्पर्धा रंगल्याचं पहायला मिळतंय.

 

Similar News