अयोध्या निकालावर काय म्हणाले शरद पवार

Update: 2019-11-09 10:56 GMT

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाविषयी बोलताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं स्वागत आणि सन्मान करण्याचं आवाहन केलं आहे. देशातील नागरिकांवर शांती आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Full View

Similar News