धनंजय मुंडेच्या समर्थकांची गुंडगिरी, व्यापाऱ्याला केली बेदम मारहाण

Update: 2020-02-18 11:51 GMT

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरपंचाला मारहाण केल्याचा घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अमर देशमुख असं मारहाण करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच नाव आहे. प्रोपर्टी वादातुन हा सर्व प्रकार झाल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये अमर देशमुख यांना 5 ते 6 लोक मारहाण करत असल्याचा स्पष्ट दिसत आहे.

पुण्यातील व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

गणेश कराड हे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचे बोलले जातंय. या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली असून ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना मी बीड पोलिसांना विनंती केली आहे. व्यक्तिगत भांडणात कृपया माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती.

अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/288079292168345/&show_text=0&data-width=560" data-width="560" data-height="314" data-style="border:none;overflow:hidden" scrolling="no" data-frameborder-value="0" data-allowtransparency="true" data-allowfullscreen="true">

Similar News