केंद्र सरकार करतंय दारूड्यासारखं काम; प्रकाश आंबेडकर यांचा हल्ला

Update: 2019-12-14 08:11 GMT

दारूडा जसं दारू साठी आपल्या घरातील दागीने विकतो तसं हे सरकार पैशासाठी देशाचे नवरत्न विकण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी विकायला काढण्याचाच अर्थ आहे की सरकारचं अर्थकारण बुडालंय. सरकारकडे निधी नाही म्हणून हे सरकार बीपीसीएल सारखं नफ्यात असलेलं कॉर्पोरेशन विकायला निघालंय.

आज शेअर मार्केट मध्ये बीपीसीएल, एअर इंडिया यांचा शेअर किती आहे हे सर्वांना माहित आहे. अशा वेळी सरकारने सामान्य माणसांना आवाहन करावं की ते किती ला हे शेअर विकत घ्यायला तयार आहे. सरकारने समिती नेमावी तिने शेअर चे दर ठरवावेत. त्यानंतर जी सरासरी निघेल त्या सरासरी वर हे शेअर सामान्य लोकांना विकावेत, खाजगी उद्योगपतींना विकू नये, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/440537676641772/

Similar News