राज ठाकरेंनी विचारधारा बदलली तर भाजपसोबत घेऊ- प्रविण दरेकर

Update: 2020-02-04 06:38 GMT

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सर्व विकासकामे थांबवली असून त्याचा गंभीर परिणाम राज्याच्या विकासावर होणार असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. ते मॅक्स महाराष्ट्रशी बोलत होते. महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेल्या मुलाखतीत दरेकर यांनी राज्य आणि देशातील अनेक मुद्यांवर आपली मते मांडली.

आरेतील कारशेडला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपलं काम सुरू केलं, पण आता त्याच ठिकाणी कारशेड बनवण्याशिवाय पर्याय नाही असा अहवाल समितीकडून आल्याचं समजतं असं दरेकर यांनी सांगितलं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेले निर्णय योग्य होते अशी पुस्तीही दरेकर यांनी जोडली. दरेकर यांनी आपल्या मुलाखतीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा केला.

शिवसेनेचं हिंदुत्त्व बदललं आहे असं सांगुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याऐवजी आता सामनातून वंदनीय असं लिहिलं जातं. त्यातूनच शिवसेनेची बदललेली भूमिका स्पष्ट होते असे ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत फक्त सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने युती केली, सत्ता मिळाल्यानंतर सर्वजण सत्तेच्या मस्तीत मश्गूल झाले आहेत असा आरोप त्यांनी केला.

सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) ला करण्यात येणारा विरोध घुसखोरांना फायदेशीर ठरतो आहे. शाहीन बाग आंदोलन हे कुणीतरी घडवले आहे. एनआरसी कायद्यात हिंदूंकडून पुरावे आहेत मग कशाला घाबरता असा सावल दरेकर यांनी विरोधकांना केला.

मनसेने आपली विचारधारा बदलली तरच भाजप त्यांना सोबत घेण्याचा विचार करु शकते असं मत दरेकर यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नव्या भूमिकेवर व्यक्त केलं. झेंडा बदलून नाहीतर रचनात्मक कामाने पक्ष पुढे जातो असतो असे ते म्हणाले.

प्रवीण दरेकर यांची संपूर्ण मुलाखत आपण महाराष्ट्रावर पाहू शकता...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/135288950937491/?t=1

Similar News