सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पाड्यांना दारुचा विळखा, मेधा पाटकर यांचा नवा संघर्ष

सरदार सरोवर प्रकल्पात सर्वस्व गमावलेल्या आदिवासींसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर यांना आता पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये नवा संघर्ष करावा लागतोय.

Update: 2020-09-14 08:31 GMT

आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी लढा देणाऱ्या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी नर्मदा सरोवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या पाड्यांमध्ये दारूबंदी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी यासंदर्भातले निवेदन दिले आहे. या पाड्यांमध्ये दारुमुळे आतापर्यंत 11 जणांनी आत्महत्या केली आहे. यात महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्र खाली येणाऱ्या नागरिकांसाठी मेधा पाटकर यांनी सासत्याने लढा दिला. त्यांना शिक्षण, आरोग्य, घरे, जमिनी आणि त्यांचे अधिकार मिळवून दिले आहेत. परंतु दारुमुळे परिवार उध्वस्त होत असतील तर आमच्या लढ्याचा काय फायदा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या संपूर्ण पाड्यात दारूबंदी करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

Full View

Similar News