अँब्युलन्स चालकाचा आगळा वेगळा वाढदिवस

Update: 2020-06-12 16:05 GMT

कोरोना सुरू झाल्यानंतर अनेकजण भीतीने घरी बसले. पण अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे. काही तब्येतीचं कारण देत कामावर येणं टाळलं. पण काही मात्र, आपलं कर्तव्य समजून काम करत राहीले. अँब्युलन्स सेवा ही त्यातलीच. अँब्युलन्स चालवणारे अनेक ड्रायव्हर त्यावरील कर्मचारी हे इमाने इतबारे काम करत आहेत. आणि हे काम करत असताना त्यांनी स्वत:चा स्वार्थही बाजूला ठेवला आहे.

त्यातीलच विकास काजळे हे एक नाव. 108 ही अँब्युलन्स चालवताना आज त्यांचा वाढदिवस. शरद कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवस असतानाही विकास यांनी आज कामावर येत कर्तव्य बजावले. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विकास काजळे यांनी हा वाढदिवस साजरा करणाऱ्या लक्ष्मीकांत छाब्रिया यांच्याशी बातचित केली पाहुयात एक आगळा वेगळा वाढदिवस.

Full View

Similar News