शेतकऱ्याची अंत्ययात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Update: 2019-11-14 17:16 GMT

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिडा अतोनात वाढल्या आहेत. यात सरकारचा ढिम्मं कारभार अधिक भर घालतो. मदतीची आश्वासनं मिळतात मात्र मदत पोहचत नाही आणि शेतकरी आत्महत्या करतो.

आज अमरावती जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंत असताना नाही तर किमान मृत्युनंतर मदत मिळावी म्हणुन शेतकऱ्याचा मृतदेह गावकऱ्यांनी चक्क जिल्हाधिकरी कार्यालयासमोर ठेवला.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील ४७ वर्षीय सुधाकर महादेवराव पाटेकर यांनी काल विषप्राशन केले. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

सुधाकर यांनी तीन एकर शेतीमध्ये सोयाबीन लागवड केली होती पण पावसामुळे सोयाबीन खराब झाले. डोक्यावर बँक कर्जाचा बोजा वाढल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

या घटनेनंतर संतप्त गावकरी सुधाकर यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आले आणि मदतीची मागणी केली. तब्बल २० मिनिट जिल्हाधिकारी परिसरात हा मृतदेह पडून होता. परिसरात चांगलाच तणाव ही निर्माण झाला होता. अप्पर जिल्हाधिकारी यांनी मदतीची मागणी मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा मृतदेह उचलत गावी नेला.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2590032114444983/?t=1

Similar News