रिवर्स मायग्रेशन मुळे Tier -2 आणि ३ शहरांमध्ये घरांची मागणी वाढेल: राजेंद्र मिरगणे

Update: 2020-05-26 16:07 GMT

रिवर्स मायग्रेशन मुळे Tier -2 आणि ३ शहरांमध्ये घरांची मागणी वाढेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्याशी बातचित केली.

याबाबत बोलताना मिरगणे यांनी आपल्या महाराष्ट्रात परराज्यातील अनेक कामगार काम करतात. हे कामगार त्यांच्या राज्यात पुन्हा परतत आहेत. अशा कामगारांना त्या ठिकाणी काम मिळालं तर घरांची आवश्यकता भासू शकते. विशेष म्हणजे जे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतले आहेत. असे कामगार त्याच ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या कामगारांना त्या ठिकाणी काम मिळेल का? जर त्यांना त्या ठिकाणीच काम मिळाले तर त्या राज्यांमध्ये अशा घरांची मागणी वाढू शकते.

मात्र, महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण महाराष्ट्रातील कामगार जे गावाकडे परतले आहेत. ते पुन्हा शहरात येतील. विशेष म्हणजे या कामगारांचे या शहरात पहिलेच घरं आहेत. त्यामुळं त्यांना नवीन घरांची गरज पडणार नाही. मात्र, महाराष्ट्र वगळता इतर राज्यात ही गरज निर्माण होऊ शकते. असं मत राजेंद्र मिरगणे यांनी व्यक्त केलं आहे.

Full View

Similar News