भावाच्या ‘त्या’ गुंडगिरीवर नवाब मलिक काय म्हणाले पाहा..

Update: 2020-01-15 11:02 GMT

पुर्व उपनगरातील नगरसेवक कप्तान मलिक यांनी रस्त्यावर केबल टाकण्याचं काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलच तापलं आहे. या व्हिडीओत कप्तान मलिक (Kaptan Malik) कामगारांना धमकावत असुन त्यांचं सामानही जप्त केलं गेलं. या प्रकरणावर सर्वच स्तरातून मलिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

संबंधित बातमी..

अल्पसंख्यांक मंत्री आणि कप्तान मलिक यांचे बंधु नवाब मलिक (Cabinet Minister Nawab Malik) यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटलं की, “हा व्हिडीओ दिड महिन्यापुर्वीचा असून त्यावेळीच मी कप्तान यांना ताकीद दिली होती. कामगारांनी तक्रार दाखल केल्यास यावर कारवाई होणं गरजेचं आहे.

हे ही वाचा..

“कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही मग तो नगरसेवक असेल किंवा कोणाचा नातेवाईक असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर मजुर तक्रार करत असतील तर पोलिसांनी कारवाई करावी.” अशी भुमिका नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली आहे. पाहा व्हिडीओ...

Full View

 

Similar News