बीड बंदला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

Update: 2019-12-20 14:19 GMT

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि एनआरसी (NRC) बिल विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. सध्या दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरासह जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

https://youtu.be/OGPHQdMPktQ

Similar News