Big News : बाळासाहेब ठाकरे स्मारक वाद, एकही झाडं तोडलं जाणार नाही - महापौर

Update: 2019-12-08 04:16 GMT

औरंगाबाद (Aurangabad) शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक ( Balasaheb thackeray smarak) बांधले जाणार आहे. यासाठी सुमारे 5 हजार झाडं पाडली जाणार असल्याचं वृत्त माध्यमांवर झळकल्यानंतर शिवसेनेने आपला पवित्रा बदलला आहे. शिवसेनेने (Shivsena) आरे येथील झाडं पाडल्यानंतर भाजप (BJP) च्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.

आणि सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरेच्या कारशेडला स्थगिती दिली. मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या स्मारकासाठी 5 हजार झाडं तोडली जाणार असल्याचं समोर आल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं होतं.

हे ही वाचा...

Big News : बाळासाहेब ठाकरे स्मारक वाद, एकही झाडं तोडलं जाणार नाही – महापौर

BIG NEWS : पक्षात राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल – एकनाथ खडसे

हैदराबाद एनकाउंटर : बदला कधीही न्याय असू शकत नाही – सरन्यायाधीश बोबडे

या संदर्भात आम्ही औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडोले यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी कुठल्याही प्रकारची झाडं तोडली होणार नाही, झाडंच काय तर झाडाचं पानही तोडलं जाणार नाही, आरे सारखी पुनरावृत्ती औरंगाद येथे होणार नाही, प्रियदर्शनी उद्यान, एमजीएम कॅम्पस या ठिकाणी नियोजित जागेत स्थापना करणार आहेत.

सर्वसामान्यांच्या मनातच हेच आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे. म्हणून यासाठी हे स्मारक बनणार असून सुमारे 17 एकर जागेत हे स्मारक बांधले जाणार आहे. त्याविषयी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत.

Full View

Similar News