पंढरपूरचे आणि तिरुपतीमधील मंदिरं ही बुद्धविहारच- अशोक कांबळे

Update: 2022-05-27 14:23 GMT

नागपूरचे डॉ. सतीश आगलावे यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्धविहार असल्याचा दावा केला आहे. त्यात आता भीम आर्मीने उडी घेतली आहे. फक्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिरच नव्हे तर तिरुपती बालाजी मंदिर ही बुद्ध विहार असल्याचा दावा भीम आर्मीने केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइजम' आणि प्रबोधनकर ठाकरे यांच्या 'धर्माचे देऊळ आणि देवळांची धर्म' या पुस्तकांचा दाखला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर लवकरच हजारो बौद्ध अनुयायांना घेऊन पंढपुरातील विठ्ठल मंदिरात सामूहिक बुद्ध वंदना घेणार असल्याचा इशाराही भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.

Full View
Tags:    

Similar News