बीडमध्ये सिंदफना नदीने बदललं पात्र; शेतकऱ्यांची 5 एकर शेती पिकांसह गेली वाहून...

बीड मध्ये वाहणाऱ्या सिफंदना नदीने कुर्ला आणि औरंगपूर परीसरात आपलं पात्र बदललं आहे. यामुळे सदर परिसरातील १० ते १२ शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या बदललेल्या पात्रात वाहून गेल्या आहेत. जवळपास ५ एकर जमिन नदीमध्ये बाधीत झाल्याचं म्हटलं जात आहेत. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी....

Update: 2022-10-26 08:13 GMT

एकीकडे दिवाळीचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. बीडच्या कुर्ला, औरंगपूर गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सिंदफना नदीने पात्र बदलल्याने, उभ्या पिकांसह जवळपास 5 एकरवरील जमिनी वाहून गेल्या आहेत.

Full View

सिंदफना नदीवरील औरंगपूर शिवारातील केटीवेअर बंधाऱ्यालगत सिंदफना नदीने तिचं पात्र बदलले आहे. यामुळे औरंगपुरच्या कल्याण उनवणे, जिजाबाई श्रीरंग उनवणे, संजय घोडके यांच्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलीय.





 


मात्र अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गतवर्षी कल्याण उनवणे यांची विहीर वाहून गेली होती, तर दोन दिवसापूर्वी त्यांचा बोरही वाहून गेलाय. त्याचबरोबर यंदा झालेला अतिवृष्टी त्यांच्या जवळपास 30 फूट जमिनीला देखील नदीचं रूप आलंय. त्यामुळे आता कापूस कुठे पेरावा? आता जगावं कसं ? असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा आहे. इतर लोकांशी व्याज व्यवहारी करून पाच एकर जमीन घेतली. मात्र त्यापैकी जवळपास 5 एकर जमीन वाहून गेली. आणि या जमिनीला नदीचे स्वरूप आलं. यामुळे आमच्या कुटुंबांने जगावं कसं ? कुठे पेराव ? असा प्रश्न पिडीत शेतकरी उपस्थित करत आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला आहे, मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...




 


Tags:    

Similar News