सहा दिवसात माफी मागा अन्यथा......नाभिक समाजाचा इशारा

महाविकास आघाडी सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्या सारखे असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यामुळे त्यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर समाजाने मोर्चा काढला आहे, प्रतिनिधी धम्मशील सांवत यांचा रिपोर्ट.....

Update: 2022-03-15 14:19 GMT

 महाविकास आघाडी सरकार हे तिरुपती बालाजी येथील न्हाव्या सारखे असल्याचे व्यक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले होते. याबाबत नाभिक समाजात तीव्र संतापाची भावना पसरली आहे.




 


रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोच्या संख्येने दानवेच्या विरोधात मोर्चा काढला. सहा दिवसात दानवे यांनी समाजची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे. यावेळी दानवेच्या फोटोला जोडे मारून त्याच्या पेंढ्याच्या पुतळ्याला आग मोर्चेकरांनी लावून दहन करून निषेध व्यक्त केला.


 



अलिबाग शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्च्याला सुरुवात झाली. एसटी स्थानक, अरुणकुमार वैद्य शाळा, न्यायालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा पोहचला. यावेळी हिराकोट तलावाजवळ मोर्च्याला अडविण्यात आला.




 



त्यानंतर मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. एवढी माणसे कशाला दानवेच्या मैताला, निम का पत्ता कडवा है दानवे ...... है, दुरी तिरी इक्का, दानवे आहे .....दानवेच्या बैलाला .... अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.


Full View

Tags:    

Similar News