संबित पात्रा जेव्हा मोदी सरकारचे वाभाडे काढतात...

Update: 2020-01-30 08:42 GMT

भाजपचे (BJP) प्रवक्ते संबित पात्रा (sambit patra) सर्वांनाच परिचित आहेत. कॉंग्रेसवर टीका करताना आपल्याला नेहमी ते वेगवेगळ्या चॅनेलवर पाहायला मिळतात. कॉंग्रेसवर टीका करताना ते कसलीही कसर सोडत नाही.

मात्र, देशातील विरोधी पक्ष किती कमजोर आहे. हे सांगताना त्यांनी मोदी सरकारने देशात कशी वाट लावली याचा पाढाच वाचला. एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर उपरोधिक टीका करताना त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशाची कशी वाट लागली, तरी विरोधी पक्ष कॉग्रेस उभा राहू शकला नाही. असं म्हणत संबित पात्रा यांनी, मोदी सरकारच्या काळात देशाचं मोठं नुकसान झाल्याचं मान्य केलं आहे.

“तुम्ही लोकं जरा विचार करा. अशी परिस्थिती आहे की, अर्थव्यवस्था घसरली झाली आहे. जीपीडी घसरला आहे. कुणाला नोकरी नाही. लोकं मरत आहे, तरीही काँग्रेस पक्ष उठत नाहीये.

आज काँग्रेस पक्षाला आत्मपरिक्षणाची गरज आहे. देश इतका लुटला गेला आहे. देश बर्बाद झाला आहे. भारत कुठेच राहिलेला नाही. देशाचं लष्कर संपली आहे आणि तरीही काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष उभं राहता येत नाहीये.

दररोज वर्तमानपत्र वाचलं तर राहुल गांधी यांना रिलाँच करणार, असं वृत्त वाचायला मिळतं. काँग्रेस किती वेळा हे सॅटेलाईट लाँच करणार आहे. किती वेळा लाँच करणार आहे.

मी लोकांना सांगतो की, हे राहुल गांधी (rahul gandhi) नावाचं सॅटेलाईट लाँच होऊच शकत नाही, कारण इंधनच संपलं आहे. आता इस्त्रो जरी आली आणि त्यांनी मदत केली तरीही राहुल सॅटेलाईट लाँच होणार नाही,”

 

Similar News