पहा विविध देशातील नोटा आणि नाण्यांचा संग्रह करणारा अवलिया
असे म्हणतात शौक बडी चीज हें. असाच काहीसा प्रत्यय बीड मधल्या एका कपडा व्यापार करणाऱ्या व्यक्तीमधे दिसून आला आहे. मोमीन रिजवान हे व्यवसायाने कापड विक्रेते आहेत. त्यांची असलेली हौस आणि त्यासाठीचा छंद थोडा वेगळा आहे. रिजवान यांच्याकडे एक दोन नव्हे तर 15 हून अधिक देशातील चलनी नोटांचा संग्रह आहे.बीड शहरातील कारंजा परिसरात मोमीन रिजवान मागील पंचवीस वर्षांपासून कापड व्यवसाय करतायत, पंधरा वर्षापासून वेगवेगळे देशातील नोटा आणि नाणे एकत्र करत ते आपला छंद जोपासत आहेत.;
0