गोंधळ लसीकरणाचा : 43-44 डिग्री तापमानात लसीकरणासाठी प्रतीक्षा

राज्यात लसीकरणाला सुरूवात झाली असली तरी नागरिकांना प्रत्यक्षात लस मिळवण्यासाठी कसा जीवघेणा संघर्ष करावा लागतोय, हे वास्तव दाखवणारा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2021-05-10 14:19 GMT

1 मे पासून 18 ते 44 वर्षांवरील सगळ्यांना कोरोनावरी लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. पण प्रत्यक्षात लसींचा तुटवडा असल्याने 45 वर्षांवरील अनेकांचे लसीकरण झालेले नाही. त्यातच आता कोरोना लसीकरण केंद्रांवर आपल्या लस मिळावी म्हणून लोकांचा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात हीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात तर लस घेण्यासाठी रात्री आणि पहाटेपासून लोकांच्या रांगा लागत आहेत.


भर उन्हात लसीसाठा तासनतास रांगा

मे महिना अर्ध्यावर आला आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या 43 ते 44 डिग्रीपर्यंत तापमान जाते आहे. पण या उन्हात सुद्धा लस मिळण्यासाठी सर्वच केंद्रावर लोकांची झुंबड दिसून येत आहे. हेच चित्र राज्यातील अनेक भागात आपल्याला दिसत आहे. लसींचा मोजका साठा उपलब्ध होत असल्याने लस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. प्रशासनाचेही या लसीकरण केंद्रांवर नियंत्रण नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


लसीकरण केंद्रांवर गर्दीमुळे संसर्गाची भीती

लसीकरण केंद्रांवर सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. कोरोना कमी होण्याऐवजी अधिक फैलाव होण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रांवर सुविधा नसल्याने जेष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. लसीकरण केंद्रांवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील लसीकरण केंद्रांवर वेळीच नियोजन केले नाही तर लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो यासाठी सरकारनं वेळीच लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.




 


Tags:    

Similar News