सरकारच्या योजनांचा जनतेला कोणताही फायदा नाही - जयंत पाटील

Update: 2019-08-03 16:01 GMT

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर इथुन ६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु होणार आहे. ही यात्रा २२ जिल्हे व ८० तालुक्यांना स्पर्श करणार आहे. ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पार पडणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. या यात्रेची सुरूवात शिवनेरी पासुन सुरू होवून रायगड इथं या यात्रेची सांगता होईल.

या यात्रेमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे अनेक दिगज नेते उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा कोणत्याही पक्षाला निच्या दाखवण्यासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आणि बारा बलुत्याच्या हीतासाठी पार पडणार असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगीतलं.

यापुढं बोलताना ते म्हणाले की, हे सरकार अनेक कामांमध्ये अपयशी ठरलं आहे. या पाच वर्षात जे नाही झाल ते आमचं सरकार आल्यास पुढील पाच वर्षात होइल. सरकारने अनेक लाखो कोटीचे प्रकल्प सुरू केले आहेत परंतु त्याचा जनतेला कोणताही फायदा नाही. हे सर्व प्रकल्प फक्त आणि फक्त जनतेला दाखवण्यासाठी आहेत. जनता सरकार कडुन नाराज आहे. याची कारण बेरोजगारी, खोटी कर्जमाफी ही आहेत. असं पाटील यांनी म्हटलं आहे.

Similar News