बापरे,राज्यात महामुंबई सर्वाधिक दूषित शहर..

Update: 2022-03-25 13:26 GMT

बापरे,राज्यात महामुंबई सर्वाधिक दूषित शहर..अभ्यास करणाऱ्या संस्थेने एक धक्कादायक अहवाल समोर आला असून यात राज्यात मुंबईपेक्षा झपाटय़ाने विकसित होणारी महामुंबई ही सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अनुमान या संस्थेच्या राज्यातील १८ शहरांच्या अभ्यासावरून दिसून येत आहे. यात धूलिकणांचे प्रदूषण अधिक आहे.यात मुंबई पेक्षा, महामुंबईत आर्थात,नवी मुंबई,उरण, पनवेल आणि उलवे या परिसरात मोठ्या प्रमाणात चालू असलेली बांधकामे, जेएनपीटीचे विस्तारीकरण,आणि प्रस्तावित नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे चालू असलेले काम,या मुख्य गोष्टी अधोरेखित करणाऱ्या आहेत. या कामांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे वाहतूक ज्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

हवेतील धूलिकणांच्या प्रमाणावरून प्रदूषणाची पातळी ठरणाऱ्या क्रमवारीत महामुंबईतील धूलिकण हे ५६ मायक्रो ग्रॅम प्रति क्युबिक मीटर जाडीचे आहेत.ज्यामुळे हे धुळीचे कण श्र्वासनावाटे शरीरात गेल्यास अनेक प्रकारचे श्वसनाचे विकार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, प्रदूषित शहरे या यादीत मुंबईचा क्रमांक हा १२४ आहे, पण नवी मुंबई, पनवेल, उरण हे महामुंबई क्षेत्र ७१ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या राहण्यास उत्तम शहर या चार वर्षांपूर्वीच्या निकषाबरोबरच राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणूनही या शहराची नवीन ओळख तयार होत आहे.

या अहवालानुसार पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष भगवान केसभट हे सांगतात की,जर यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने पर्यावरण मंत्रालय आणि सबंधित विभागाने वेळीच योग्य उपाययोजना आणि कुठल्याही बांधकामाला परवानगी देताना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही,तर येणाऱ्या पुढील काळात,मानवी जीवनावर याचे विपरीत आणि जीवघेणे परिणाम होणार,यात खास करून गर्भवती स्त्रिया आणि दमा, अस्थमा आणि इतर श्वसनाशी सबंधित आजार असणाऱ्या नागरिकांवर याचे गंभीर परिणाम होतील. याच अनुषंगाने आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष भगवान केसभट यांच्याशी संवाद साधला...


Full View

Tags:    

Similar News