Max Maharashtra Impct : अखेर आळसंद गावाला मिळाले प्राथमिक आरोग्य केंद्र

बातमी आहे मॅक्स महाराष्ट्रच्या इम्पॅक्टची...गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेली गावकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

Update: 2020-12-17 15:04 GMT

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा आणखी एक इम्पॅक्ट झाला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर तालुक्यातील आळसंद इथे हलवण्यात यावे अशी मागणी आसपासच्या जवळपास २० गावांमधून होत होती. पण त्याची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली नव्हती. मॅक्स महाराष्ट्रने "एका महिला सरपंचाचा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लढा" या शीर्षकाखाली बातमी प्रसारीत केल्यानंतर त्याची दखल सांगली जिल्हा परिषदेने घेतली आणि १० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अखेर आळसंद इथे सुरू करण्यात आले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून आळसंद आणि आसपासच्या गावकऱ्यांचा लढा सुरू होता. कोर्टाने आदेश देऊनही कारवाई होत नव्हती. पण मॅक्स महाराष्ट्रने या लोकांची व्यथा मांडली आणि शासकीय यंत्रणेला जाग आली. आता या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले आहे. याबद्दल येथील नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाने पुढाकार घेत तातडीने आदेश काढून या आरोग्य केंद्राचे स्थलांतर केले आहे. आज परिसरातील पंधरा ते २० गावातील आरोग्याचा प्रश्न या आरोग्य केंद्रामुळे सुटणार आहे.



नेमकी समस्या काय होती?

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आधी ग्रामीण रुग्णालय नव्हते. त्यामुळे इथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आसपासच्या परिसरातील गावांमधील अनेक लोक याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. कालांतराने विटा शहरात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच असलेल्या आळसंद इथे हलवावे अशी मागणी पुढे आली. आळसंद हे ठिकाणी आसपासच्या जवळपास २० गावांमधील लोकांना सोयीचे आहे.




 अखेर हे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर हे आरोग्य केंद्र आळसंद येथे व्हावे असा आदेश कोर्टाने दिला होता. तरीदेखील प्रशासनाकडून यावर कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते. पण मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्तानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली आणि कामाला लागली.

Tags:    

Similar News