Ground Report : कोरोनानंतर यात्रांचे अर्थकारण, एकाच दिवसात १२ कोटींची उलाढाल

Update: 2022-04-28 08:20 GMT

गेल्या दोन वर्षात कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यातील यात्रा, आठवडी बाजार ठप्प झाले होते. पण आता निर्बंध उठल्यानंतर यात्रांना सुरूवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथील सिध्दनाथाची यात्रा नुकतीच पार पडली 'नाथबाच्या नावानं चांगभलं', 'सासनाचं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला. ढोल-ताशांच्या निनादावर सासणकाठ्या नाचवत लाखो भाविक यात्रेत सहभागी झाले आहेत.




 

ही यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले होते. खिलार जनावरांच्या खरेदी-विक्रीतून 12 कोटींची उलाढाल झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष येथील यात्रा बंद होती, मात्र दोन वर्षा नंतर भरलेल्या यात्रेला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

Tags:    

Similar News