कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर आसमानी संकट

Update: 2022-03-17 10:57 GMT

आंबा हा फळांचा राजा आहे हे जगमान्य झालेले असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे . कोकणातील हापुस चविसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोकणातील आंबा उत्पादकांना बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. आंबा बागायतदार पुर्णपणे कोलमडून गेला आहे. यंदा हापूस आंबा चाखायला तरी मिळेल की नाही ही धास्ती शेतकऱ्यांना सतावतेय, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....

आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारताचा तसेच महारष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो . महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर आहे . मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे पैसा मिळत आहे . हापूस आंब्यापाठोपाठ इतर विभागातील केशर आंबाही मोठ्या प्रमाणात निर्यात होण्यास सुरुवात झालेली आहे . त्यामुळे आंब्यापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळत आहे . परंतु , दर वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होतांना दिसून येते . रायगड जिल्ह्यात साधारण त 56 ते 60 हजार इतके आंबा बाग़ायत दार आहेत. तर कोकणात आंबा लागवड खालील क्षेत्र मोठे असल्याने साधारण त साडेचार लाख आंबा बाग़ायतदार असल्याची माहिती मिळते.




 


बदलत्या हवामानामुळे यावर्षी दि . १ व २ डिसेंबर २०२१ रोजी अवकाळी पाऊस झाला . तसेच ऊष्मा देखील वाढला आहे. त्यामुळे आंब्याला खास करून कोकणातील हापूस आंब्याला पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर कुजून गेला . मावा व तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव झाला . आंबा उत्पादकांनी महागडी कीटकनाशके , पेस्टीसाईडस् व बुरशी नाशके यांचा वापर करून प्रचंड मेहनत केली . मोहर धरला मात्र मोहरात नर फुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे फळधारणा झाली नाही . त्यामुळे या वर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा वाईट झाला आहे . जेमतेम १० ते १५ टक्के उत्पन्न मिळणार असल्याची चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे. मोहर टिकविण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढला आहे . सध्या नेहमीच आभ्राच्छादीत व विचित्र हवामानामुळे फेब्रुवारीला संपणाऱ्या फवारण्या मार्चपर्यंत व पुढे देखील लांबल्या आहेत . वाईट हवामानामुळे वाटाण्याएवढे आंबे देखील धरले जात नाहीत . अशी परिस्थिती दिसुन येते आहे.

भारतात आंब्यांची लागवड सुमारे ४,००० वर्षांपूर्वीपासून होत असावी व त्याचे मूलस्थान आसाम , ब्रह्मदेश किंवा सयाम असावे , असे मानतात . आंबा फळ अनेक धार्मिक विधींत याची पाने , मोहोर व फळे पवित्र व आवश्यक मानतात . कच्ची फळे ( कैऱ्या ) लोणची , मुरंबे व पन्हे यांकरिता आणि पक्की फळे खाण्यास व मिठाईकरिता उपयुक्त . खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातडी कमावण्यास आणि रेशीम , सूत व लोकर रंगविण्यात वापरतात . लाकूड बांधकाम , शेतीची अवजारे , खोकी इत्यादींकरिता उपयोगी पडते . पक्व फळ सारक , मूत्रल व गर्भाशयातून किंवा फुप्फुसातून होणाऱ्या रक्तस्रावावर उपयुक्त ; बिया दम्यावर ; फळाची साल स्तंभक ( आकुंचन करणारी ) उत्तेजक व शक्तिवर्धक गुरे पाला आणि फळांच्या साली खातात . . महाराष्ट्रातील आंबा लागवडीखालील क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत आहे . राज्यात अनेक भागात आंब्याच्या केशर , लंगडा , पायरी , हापूस , रत्ना अशा अनेकविध वाणांची शेतकरी बांधवांनी लागवड यशस्वी केलेली निदर्शनास येते . आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात . प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलीमीटर एवढी असते . आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हणतात . मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. जर पाऊस नियमित पावसाळा सोडून नोव्हेंबरमध्ये देखील पडत राहिला आणि थंडी पडायला उशीर झाला तर आंब्याची मोहोर येण्याची प्रक्रिया रखडते .




 


त्यामुळे आंब्याला मोहोर उशिरा येतो . काही वेळा आपल्याला असे दिसून येते , की ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै किंवा ऑगष्ट महिन्यात ज्यावेळी भरपूर पाऊस सतत पडणे अपेक्षित असते त्यावेळी जर मोठा खंड पडला म्हणजे पाऊस न पडता १५ ते २० दिवस सारखे ऊन पडले तर अशा वेळेला बागेमध्ये आंब्याल मोहोर यायला सुरूवात होते . विशेषतः समुद्रानजीकच्या आंबा बागेमध्ये अवेळी मोहोर येण्याची उदाहरणे याकारणांमुळे आहेत . पावसाळ्यात आंब्याच्या झाडाला सतत पाणी मिळत गेले तर अशा आंब्याच्या झाडाला उशिरा मोहोर येण्याची दाट शक्यता असते . आंब्याची फुले १० ते ४० सेंमी लांबीच्या गुच्छामध्ये येतात . प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिमी एवढी असे . आंब्याच्या फुलांना मोहोर अस म्हणतात . मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो . आंब्याच्या उत्पादनात मोहोर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे . प्रमुख व दुय्यम पोषण द्रव्यांची कमतरता , संजिवकांचा आभाव , पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आणि कीड - रोगांचा प्रादुर्भाव या सारख्या कारणांमुळे मोहोर गळ आणि फलगळ होते . पॅक्लोब्यूट्राझोल वापरलेल्या बागांमध्ये उशिरा म्हणजे नोव्हेंबरऐवजी डिसेंबरमध्ये मोहोर येण्याची दाट शक्यता असते . हमखास मोहोर येण्यासाठी २ मि.लि. क्लोरमेक्वॉट क्लोराईड प्रति लिटर या प्रमाणात दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्यास फायदा होऊ शकतो .

त्याचबरोबर चार टक्के पोटॅशिअम नायट्रेटच्या दोन फवारण्या दहा दिवसांच्या अंतराने केल्याससुद्धा मोहोर येण्यास मदत होते . मात्र आलेल्या मोहोराचे चांगल्या प्रकारे संरक्षण करून जास्तीत जास्त फळधारणा कशी होईल यावर लक्ष केंद्रित करावे लागते . आंब्याची उत्पादकता ही मोहोरावरील कीड व रोगापासूनचे संरक्षण या बाबीवर अवलंबून आहे. त्यामुळे आबा मोहोराचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे . आंब्याच्या मोहोरावर प्रामुख्याने तुडतुड , फुलकिडे , मीजमाशी , शेंडा पोखरणारी अळी इत्यादी किडींचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोहोराचे अतोनात नुकसान होत असते . म्हणूनच याकिडींचा आणि भुरी रोगाचा बंदोबस्त करून मोहोराचे संरक्षण करणे गरजेचे आहे.




 


कीड व्यवस्थापन : आंब्यावर मोहोरावरील तुडतुडे , शेंडा पोखरणारी आळी , खोडकिडा , मिजमाशी , फुलकिडा , इ . किडींचा प्रादुर्भाव होतो . १ ) तुडतुडे : आंबा बागेमध्ये मोहोर पूर्णपणे फुललेला असताना ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो . तुडतुडे ही आंब्याची महत्त्वाची नुकसानकारक कीड असून या किडीच्या विविध २० ते २२ जातींची नोंद झालेली आहे . पैकी महत्त्वाच्या तीन जाती म्हणजे अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी इंडिआस्कोपस क्लायपिअॅलीस आणि इंडिओस्कोपस निव्हीओस्पार्सस या प्रजाती महाराष्ट्र राज्यात आंबा फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात . अॅम्रीटोडस अॅटकिनसोनी हे काळसर करड्या रंगाचे , जास्त निमुळते व लांबट असतात . इंडिओस्कोपस व्हिीओस्पार्सस जातीचे तुडतुडे हिरव्या करड्या रंगाचे , मध्यम आकाराचे आसतात . हे कीटक पाचरीच्या आकाराचे असतात .

यावेळी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना अलिबाग जांभूळपाडा येथील आंबा बागायतदार संदेश पाटील म्हणाले की यावर्षी हवामान बदल होत प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संपुर्ण कोकणात 2 डिसेंबर रोजीच्या पावसाने आंबा बागायतदार यांचे कंबरडे मोडले. 30 तास सलग पाऊस व हवा यामुळे आंबा मोहर गळून पडला, तसेच पाण्याची पातळी वाढल्याने आंबा मोहर येण्याची प्रक्रिया मंदावली. डिसेंबर महिना आंबा बागायतदार यांच्यासाठी निराशाजनक गेला. अगोदर जो मोहर आला तो बुरशी व बुरशीजन्य रोगांनी नुकसान झाले. जानेवारी मध्ये आलेला मोहोराने अगोदरचे आंबे पाडून टाकले. आंबा काढण्याचा सिजन जूनपर्यंत चालेल व जूनमध्ये पाऊस पडला तर आंबा पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. फवारणी व इतर खर्च वाढला आहे. हा परवडणारा नाही. सरकारने शेतकऱ्यांचा सहानुभूती ने विचार करावा असे पाटील म्हणाले.




 


कार्ले खिंड येथील आंबा बागायतदार शेतकरी चंद्रकांत पाटील म्हणाले की बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतोय. चार वेळा मोहोर आलाय. मोहर सतत गळून पडतोय. फवारणी व इतर खर्च न परवडणारे आहे. आंबा बागायतदार खचून गेलाय. बँका कडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा.

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकरी

रायगड जिल्ह्यात नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकरी संख्या मोठी आहे. कोकणातील ही संख्या पाच पट अधिक असल्याची माहिती मिळते. जिल्ह्यात जुलै 2021 मध्ये 8211 शेतकरी व 1532.87 क्षेत्र (हेक्टर) आंबा बागायत क्षेत्र बाधित झाले आहे. सप्टेंबर 2021 शेतकरी संख्या 621, बाधित क्षेत्र 257 हेक्टर, ऑक्टोबर 2021 शेतकरी संख्या 2214 बाधित क्षेत्र 524.19 हेक्टर, नोव्हेंबर 2021 शेतकरी संख्या 2445 बाधित क्षेत्र 838.32 हेक्टर, डिसेंबर 2021 शेतकरी संख्या 5765 बाधित क्षेत्र 1758 हेक्टर असून पाच महिन्यातील एकूण शेतकरी संख्या 19256 तर बाधित क्षेत्र 4910 .70 हेक्टर असल्याची माहिती अलिबाग रायगड कृषी विभागामार्फत देण्यात आलीय.




 


आंबा पिकाचे घटते उत्पादन चिंताजनक असून आंब्याच्या असंख्य प्रजाती टिकवने आता मोठे आव्हान झाले आहे. बदलते हवामानाचा गंभीर परिणाम आंबा उत्पादनावर होत असल्याने केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पाउले उचलून शेतकरी व बाग़ायत दार यांना भक्कमपने उभे राहण्यासाठी आर्थिक भरिव मद्त व

सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त होतेय.

रायगड जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये आंबा बागांचे क्षेत्र 14 हजार हेक्टर इतके आहे. उत्पादनक्षम आंबा बागा या 12540 हेक्टर क्षेत्रावर आहेत. मागील दोन वर्षात निसर्ग व तौक्ते चक्री वादळाने फळ बागा व आंबा बागायती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

निसर्ग चक्री वादळाने जवळपास 8000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर तौक्ते चक्री वादळाने जवळपास 1100 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाकडून एन डी आर एफ व एस डी आर एफ चे नॉर्म नुसार शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.कृषी विभागामार्फत ज्या फळ बागा क्षेत्रांचे नुकसान झाले त्या क्षेत्रात फळबाग पुनर्लागवड व पुनर्जीवित करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आजतागायत 4123 शेतकऱ्यांना 13 कोटी रक्कम वितरित केलेली आहे. अजूनही 22364 शेतकऱ्यांना जवळपास 27 कोटींचा निधी वितरित करणार आहोत. सदर निधी मंजुरीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच हा निधी देखील वितरीत केला जाईल. फळबागांचे मागील दोन वर्षांपासून होणाऱ्या नुकसानीतुन सावरण्यासाठी कृषी विभाग शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत डगमगू नये शासन व कृषी विभाग आपल्या पाठीशी उभा आहे, असे दत्तात्रेय काळभोर, उपसंचालक कृषी विभाग अलिबाग रायगड, प्रभारी कृषिअधिक्षक अलिबाग रायगड यांनी सांगितले.




 


पाच वर्षांपूर्वी कोकणात 3 लाख हेक्टरवर हापूस आंब्याची लागवड आहे. मात्र आता हवामान बदलाने अनेक संकटे फळांचा राजा असलेल्या आंब्यावर आलीय. खर्च देखील वाढला आहे. आंबा बागायतदार व शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागतय. वित्तीय संस्था , बँका कर्ज देतात मात्र त्याची परतफेड कस करणार हा प्रश्न आहे. फेब्रुवारी मध्ये येणारा आंबा मार्च मध्ये बाजारात गेला. मे च्या आठवड्यात 1 कोटी पर्यंतच्या पेट्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जातात, आज मात्र सात ते आठ हजार पेट्या बाजारात जातात, हे दुर्दैव्य आहे. कर्नाटक व आंध्र च्या आंब्याने हापुसवर आक्रमण केले आहे. हापूस विक्रीसाठी ए पी एमसी मधील दलालांनी देखिल सुळसुळाट केला आहे. ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात. शासनाने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. उत्पादन वाढीसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे चंद्रकांत मोकल, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ म्हणाले.Full View

Tags:    

Similar News