प्रत्येक तालुक्यात उद्योग पार्क

Update: 2019-06-18 09:46 GMT

राज्यात मोठ्य़ाप्रमाणात उद्योग निर्मिती व्हावी आणि त्यातून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रत्येक तालुक्यात उद्योग पार्क उभारण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.

7 मार्च 2019 रोजी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर कऱण्यात आले होते. राज्याला जागतिक स्तरामध्ये गुंतवणुकीचे उत्पादनाचे केंद्र बनवुन 10 लाख कोटी गुंतवणुक आकर्षित करुन त्यातुन 60 लाख नविन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

राज्यातील होतकरु युवक, युवतींसाठी राज्याची सर्वसमावेशक स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरु करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यंदा जवळपास 10 हजार लघु उद्योग सुरु करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिलीय.

राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाकरिता पार्क तयार करणार. सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून 50 तालुक्यांमध्ये सदर पार्कची निर्मिती प्रस्तावित. या योजनांसाठी रु.300 कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिलीय.

Similar News