Ground Report : मातीची लूट आणि अधिकाऱ्यांनी दिली सूट? पुराचा धोका वाढला

नदीपात्रातील अवैध उत्खननाचा फटका कसा बसतो हे संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या दोन वर्षात आलेल्या महापुरांनी अनुभवले आहे. पण आताही सातारा जिल्ह्यात कोयना नदीपात्रालगत मातीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे, त्यामुळे यंदाही पूर आला तर आसपासच्या भागांना कसा धोका निर्माण होऊ शकतो, याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2022-04-30 14:43 GMT

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना गेली दोन वर्ष महापुराचा मोठा फटका बसतो आहे. विशेषत: नदीपात्राच्या जवळच्या शेतांचे तर न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी महापूर आले की वाळू उपशाचा मुद्दा समोर येतो. पण आता कोयना नदी काठी असलेले अनधिकृत बांधकामे त्याचबरोबर नदीकाठी वाळू उपसा त्याचबरोबर बेकायदेशीर माती उत्खनन हे देखील प्रामुख्याने कारणीभूत आहेत. यामुळे वाळू उपशावर बंदी आणली गेली आहे. पण पाटण तालुक्यात फोफावलेला माती उत्खनन व्यवसाय राजरोसपणे दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुरू होता. यामध्ये परवानगीपेक्षा जास्त जागेत माती उत्खनन करण्यात आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. यामध्ये अनियमितता आढळल्याचे अधिकारीही सांगत आहेत.


Full View

Tags:    

Similar News