"त्यांच्या पिराला चादर चढवून आमची यात्रा सुरू होते", धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना उत्तर

मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांना इशारा दिल्यानंतर सोशल मीडियाद्वारे धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात हिंदु-मुस्लिम बांधवांच्या संबंधांची वीण किती घट्ट आहे, राजकारण्यांच्या धार्मिक विखाराबाबत ग्रामीण भागातील जनता काय विचार करते, याबाबत बीड जिल्ह्यातील एका गावातील गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत, आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...

Update: 2022-04-09 05:42 GMT

"ग्रामीण भागातील राजकारणाचा आणि शहरी भागातील राजकारणाचा कुठलाही अर्थाअर्थी काहीही संबंध येत नाही, कारण मुसलमानाच्या पिढ्या माळ्याच्या मातीला जातात आणि माळ्याच्या पिढ्या मुसलमानाच्या मातीला जातात, अनेक पिढ्यांचे आमचे नाते आहेत यामध्ये कोणीही दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये" असे मत व्यक्त केले आहे या गावातील ज्येष्ठ नागरिक दशरथ राऊत यांनी...

"आमच्या घरी काही भाजीपाला असेल तर त्यांच्या महिला खुरपणीसाठी आमच्याकडे आल्या तर त्या घेऊन जातात, मचे संबंध पिढ्यानपिढ्याचे कायमचे ठरलेले आहेत, यामध्ये काही वितुष्ट आणायचा कोणी राजकीय लोकांनी प्रयत्न करु नये असं आमचं स्पष्ट मत आहे" असा इशाराही त्यांनी देऊन टाकला आहे.

Tags:    

Similar News