इतिहासाची पुनरावृत्ती... बेलची इंदिरा आणि सोनभद्रची प्रियांका

Update: 2019-07-19 16:48 GMT

उत्तरप्रदेशातील सोनभद्रा येथील दलितांच्या हत्याकांडाविरोधात आज प्रियंका गांधी यांनी आवाज उठवत आंदोलन केलं त्याच पद्धतीने 1977 साली इंदिरा गांधींनी आदिवासी, मागासवर्गीय समाजासाठी आवाज उठवत आंदोलनं केली होती. त्या आंदोलनाचा मोठा गाजावाजाही झाला होता. तसेच त्यावेळी काँग्रेसची मोठी पडझड झाली होती. कार्यकर्त्यांची संख्याही कमी होती अशा वेळी इंदिरा गांधी यांनी हत्तीवरुन जाऊन तेथील लोकांसाठी आवाज उठवला होता. लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आशादायी चित्र उभारलं होतं आणि काँग्रेसची जोमाने उभारणी केली होती. आज प्रियांका गांधींच्या निमित्ताने इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पाहायला मिळाली आहे. प्रियांका गांधी या धरणे आंदोलन करत काँग्रेसला जोमाने उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र काँग्रेस तयार करत आहे. बेलची इंदिरा गांधी आणि सोनभद्रची प्रियांका गांधी यांच्यात नेमकं काय साम्य आहे. काँग्रेसला नवसंजीवणी मिळणार का? सांगत आहे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई पाहा हा व्हिडीओ...Full View

Similar News