साहेब,कोरनामुळे आमच्या आयुष्याचं चाक उलट्या दिशने फिरायला लागलं

छोटे-मोठे व्यवसायिक कोरोनाच्या संकटातून आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतायत. यातीलच एक म्हणजे गॅरेज चालक,दोन महिने गॅरेज बंद असल्याने गॅरेज चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पण यातूनही ते पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतायत.

Update: 2021-06-14 03:17 GMT

औरंगाबाद: कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आल्यानंतर छोटे-मोठे व्यवसायिक कोरोनाच्या संकटातून आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतायत, यातीलच एक म्हणजे गॅरेज चालक, पहिल्या लाटेतून सावरत असतानाच दुसऱ्या लाटेत सुद्धा पुन्हा दोन महिने गॅरेज बंद असल्याने गॅरेज चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.



अशीच काही परिस्थिती औरंगाबादच्या रामेश्वर तेजीनकर यांची आहे. रामेश्वर यांनी 5 वर्षांपूर्वी स्वतःच गॅरेज सुरू केलं. स्वतःची जागा नसल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर दुकान घेऊन छोटासा व्यवसाय सुरू केला.एकट्याने सुरू केलेल्या व्यवसाय वाढत असताना त्यांनी काही मुलांना कामावर ठेवलं.मात्र सगळं काही सुरळीत सुरू असतानाच गेल्यावर्षी कोरोनाचं संकट आलं.

पहिल्या लाटेत तीन महिने दुकान बंद होती, पण त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा दुसरी लाट आली, आणि रामेश्वर यांच आयुष्याचं चाक पुन्हा उलट्या दिशने फिरायला लागलं.



कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पूर्णपणे खचलो असून, मागील दोन महिन्याचं भाडं सुद्धा खिशातून भरलं,मात्र आता पुन्हा जर तिसरी लाट आली तर दुसऱ्या ठिकाणी कुठं तरी काम बघावे लागेल असं रामेश्वर म्हणतात.

रामेश्वर यांच्याप्रमाणेच इतर गॅरेज चालकांची अवस्था आहे, कोरोनामुळे आधीच व्यवसाय कमी झाले आहेत, त्यात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या संकटात सापडल्याच गॅरेज चालक सय्यद अझर म्हणतात.


करोना लॉकडाऊनमुळे लहान गॅरेज चालकांवर उसनवारी करून जगण्याची वेळ आली आहे,त्यातच दुकानच भाडं, बँकेचं कर्ज कसं फेडणार असा प्रश्न त्यांना पडत आहे,पण तरीही यातून सावरून पुन्हा उभा राहण्याची त्यांची धरपड सुरूच आहे.

Full View
Tags:    

Similar News