'तीस-तीस'मध्ये शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पाण्यात, 'मॅक्स'महाराष्ट्र'च्या बातमीमुळे अनेकांचा पैसा वाचला

Update: 2021-09-18 13:30 GMT

राज्यात गाजलेल्या केबीसी योजने प्रमाणेच आता औरंगाबादच्या ग्रामीण भागात 'तीस-तीस' या नावाच्या खाजगी योजनेने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लोकांनी यात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून व्याज सोडा मुद्दल पैसे सुद्धा मिळत नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. तर योजना चालवणारे पळून गेल्याची चर्चा सुद्धा परिसरात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त max maharashtra ने फेब्रुवारी महिन्यातच दिले होते. त्यामुळे अनेक जण गुंतवणूक करण्यापासून वाचले.


Exclusive: 'केबीसी'नंतर आता ग्रामीण भागात 'तीस-तीस'चा धुमाकूळ

औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने बनत असलेल्या शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीसाठी समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत. त्यामुळे याचा मोबदला त्यांना मिळाला आहे. मात्र, यातील अनेक शेतकऱ्यांनी व्याजाचा प्रेमात 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवले आहे. बँकेत मिळणाऱ्या व्याजापेक्षा चार-पाच पट अधिक व्याज मिळत असल्याने कसलाही विचार न करता शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये यात गुंतवले आहे. सुरवातीला अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळाल्याने त्यांनतर संख्या वाढत गेली. मात्र गेल्या सहा महिन्यापासून पैसे परत मिळाले नसल्याने अनेकांचे वांधे झाले आहेत.

अनेकांनी मानले max maharashtra चे आभार

'तीस-तीस' बाबत max maharashtra ने 8 फेब्रुवारी 2021 रोजी बातमी प्रकाशित करून, लोकांना सावध केले होते. त्यामुळे पैसे गुंतवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत पैसे गुंतवले नाही. त्यामुळे आज त्यांचा होणारं मोठ आर्थिक नुकसान टळले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी max maharashtra चे आभार मानले आहे.

Full View
Tags:    

Similar News