इंजिनियर तरुणींना व्हायचं आहे अंगणवाडी मदतनीस

चांगली नोकरी मिळावी म्हणून अनेक जण इंजिनियरिंगला प्रवेश घेतात. मात्र सोलापूरच्या इंजिनियर तरुणींना का व्हायचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस? पहा शिक्षणाच्या बाजारातून संघर्ष करत पदवी मिळवणाऱ्या पदवीधारकांचे धगधगते वास्तव...

Update: 2023-05-21 09:37 GMT

सोलापूर जिल्ह्यात सध्या मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची भरती सुरु आहे. यासाठी केवळ बारावी पास ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असताना इंजिनियरिंग (Engineering), एम ए. बी एड (MA BEd), एम एस डब्ल्यू (MSW) अशा उच्च पदवीप्राप्त महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती मोहोळ पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सुर्यवंशी (Kiran Suryavanshi) यांनी दिली.

एखादी विद्यार्थीनी इंजिनियर होण्याचे स्वप्न घेऊन प्रतिकूल परिस्थितीत इंजिनीयरची पदवी प्राप्त करत असते. परंतु उच्च शिक्षणासाठी अमाप पैसे खर्च करून देखील नोकरी प्राप्त होत नसल्याने अनेक उच्च शिक्षित महिला आज बेरोजगार आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत या उच्च शिक्षित उमेदवारांनी अगदी अंगनवाडी सेविका म्हणून नोकरी स्वीकारण्यासाठी या कार्यालयास अर्ज सादर केले आहेत. पण केवळ पन्नास जागा असल्यामुळे या उमेदवारांना उच्च शिक्षित असताना देखील अंगणवाडी सेविका म्हणून देखील नोकरी मिळणार नाही. शिक्षणाचा बाजार झालेला असताना हे शिक्षण घेऊन नोकरी मिळवताना विद्यार्थ्यांना या दाहक वास्तवाला सामोरे जावे लागणार आहे.

Tags:    

Similar News