कोरोनाच्या संकटात आणखी एका विषाणूचा धोका, सतर्कतेचा इशारा

Update: 2020-09-25 14:38 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता जनावरांमध्ये आढळणाऱ्या ‘क्रायमिन काँगो’ या विषाणूजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. गुजरातमध्ये काही प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शिरकाव करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा बाधित जनावरांपासून मानवाला संसर्ग झाला तर धोका होऊ शकतो असा इशारा पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने दिला आहे.

गायी, म्हशी, शेळय़ा, मेंढय़ांमध्ये या आजाराची लागण प्रामुख्याने होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाने खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीस आधी कावीळसारखी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, पोटदुखी, डोळे लाल, टाळूला जखम होणे अशी लक्षणे दिसतात. या आजाराची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ३० टक्क्यांपर्यंत रुग्णांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना आता क्रायमिन काँगो’ विषाणूचा धोका गांभिर्याने घेण्याची गरज आहे. म्हणूनच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा सगळ्यांनीच आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग म्हणून वापर केला पाहिजे...

Full View

Similar News