Nupur Sharmaचा माफीनामा, आता नाविका कुमारवर कारवाईची मागणी

टीव्हीवरील डिबेट शो अँकरने सांभाळायचा असतो आणि तो एकतर्फी होणार नाही याची खबरदारी घ्यायची असते. पण भाजपच्या प्रवक्त्या Nupur Shrama यांनी ज्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केले, त्या शोच्या अँकर नाविका कुमार यांच्यावरही आता कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

Update: 2022-06-06 08:47 GMT

भाजपच्या (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर तडा गेल्याची टीका होते आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे नुपूर शर्मा यांचा आणखी व्हिडिओ व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये नुपूर शर्मा (Nupur Sharma) ह्या आपल्याला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करत आहेत, एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही आपल्याला फोन करुन पाठिंबा दिला, असा दावाही नुपूर शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीच्या पत्रकार गार्गी रावत यांनी ट्विट केले आहे.

0

 दुसरीकडे भाजपच्या कृत्याबद्दल देशाने माफी का मागितली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.

Full View

दरम्यान भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली. पण आता टाईम्स नाऊच्या(Times Now) ज्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी हे वक्तव्य केले त्या कार्यक्रमाच्या अँकर नाविका कुमार यांच्यावरही कारवाईची मागणी सोशल मीडियामध्ये होते आहे. नाविका कुमार यांनी नुपूर शर्मा यांना वेळीच रोखणे गरजेचे होते, असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करने तर नाविका कुमारने (Navika Kumar) देशाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला आहे.

Full View

एवढेच नाही तर दिल्लीतील पत्रकार साक्षी जोशी यांनी नाविका कुमार त्यांचे चॅनेल कारवाई करणार का, असा थेट सवाल विचारला आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना नाविका कुमार यांनी रोखले तर नाहीच उलट त्यांची पाठराखण केली, अशी टीकाही साक्षी जोशी यांनी केली आहे.

Full View

एकूणच टीव्हीवरील डिबेट शोमध्ये जाऊन मनाला येईल ते बडबडणाऱ्या प्रवक्त्यांमुळे भाजपवर बॅकफुटवर जाण्याची वेळ भाजप आणि मोदी सरकारवर आली आहे. तर या वाचाळ प्रवक्त्यांना ऑन एअर संरक्षण देणाऱ्या गोदी मीडियाला देखील यातून धडा घ्यावा लागणार हे नक्की....

Full View

Similar News