पिकांच्या उत्पादनात घट झालीय – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

Update: 2019-06-17 13:28 GMT

अपुऱ्या पावसामुळं पिकांच्या उत्पादनात घट झाल्याची कबुली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या कृषी विकासात घट झाल्याचं सांगण्यात आलंय, तर सरकारनं विकासाचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या सर्व प्रश्नांवर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी.

पिकांचं उत्पादन का घटलं ?

राज्यात सातत्यानं पावसाचं प्रमाण कमी होतंय. त्यामुळं पिकांच्या उत्पादनात घट झालीय. मात्र, कृषी संलग्न क्षेत्रात वाढ झाल्याचा दावा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून सुमारे ४९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलीय. शेळी-मेंढी यांच्या चाऱ्यासाठीही आर्थिक तरतूद करण्यात आलीय.

...तर मग जय हिंद म्हटलं पाहिजे

राज्य सरकार विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ देत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. विरोधी पक्षनेत्यांची निवड हे विधानसभेचे अध्यक्ष करत असतात, एवढं सामान्य ज्ञान विरोधकांना असलं पाहिजे, त्यात सरकारचा संबंध काय. जर अशी परिस्थिती असेल तर मग त्यांना जयहिंद म्हटलं पाहिजे, अशी उपहासात्मक टीकाही मुनगंटीवार यांनी केलीय.

Full View

Similar News