आता संसदेत शब्दांवर बंधनं...नव्या संघर्षाची सुरूवात

Update: 2022-07-14 08:26 GMT

तानाशाह,बहरी सरकार, भ्रष्ट, जुमलाजीवी, विनाश पुरुष, गद्दार हे शब्द आता संसदेच्या पटलावरून गायब होणार आहेत. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन 18 जुलै पासून सुरू होत आहे. त्या अगोदर लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजातून हे शब्द वगळण्यात आले आहेत. लोकसभा सचिवालयाने या संदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. २०२१ पासून यावर लोकसभा सचिवालय यावर काम करत होते. त्यानुसार सचिवालयाने एक लिस्ट केली आहे.

त्यानुसार टीका करताना हे शब्द वापरले तर ते कामकाजातून वगळण्यात येणार आहे. बहरी सरकार, भ्रष्ट, जुमलाजीवी, तानाशाह, बाल बुद्धी, कोव्हिड स्प्रेडर, स्नूप गेट, विनाश पुरुष, गद्दार या शब्दांसह मगरमच्छ के आसू (घड़ियाली आंसू) जयचंद (रावणाचा भाऊ) शकुनी या सारखे शब्द आता देशाच्या संसदेत असंसदीय शब्द ठरणार आहेत.

सरकारवर टीका करताना विरोधक या शब्दांचा वापर करत असतात. आता हे शब्द संसदेत वापरता येणार नाही. लोकसभा सचिवालय ने ज्या शब्दांना असंसदीय म्हटलं आहे. ते शब्द आपण दररोजच्या जीवनात सहज वापरत असतो. जसे की इंग्रजीमधील 'ashamed', 'abused, 'betrayed', 'corrupt', 'drama', 'hypocrisy' आणि 'incompetent' यासारख्या शब्दांचा समावेश आहे.

लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयानंतर आता विरोधकांनी यांच्यावर टीका केली आहे. तृणमुल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एक ट्वीट करत आपण या शब्दांचा वापर करणार असल्याचं म्हटलं आहे. मी या शब्दांचा वापर करणार, मला निलंबित करा. असं थेट आव्हानच त्यांनी दिलं आहे.

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणतात… सरकारची अशी इच्छा आहे की, जेव्हा हे भ्रष्टाचार करतील तेव्हा त्यांना भ्रष्ट नाही तर भ्रष्टाचार चा मास्टरस्ट्रोक म्हटलं जावं. "2 कोटी रोजगार", "शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न" या सारखे जुमले सांगितले तर त्याला जुमलाजीवी नाही तर 'थैंक यू' म्हणावं

त्यांना या ट्वीट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आंदोलक शेतकऱ्यांना मोदी यांनी आंदोलनजीवी म्हटल्याची आठवण मोदी सरकारला करून दिली आहे.


एकंदरीत संसदीय पटलावरून जरी सरकारने हे शब्द हटवले असले तरी विरोधक या शब्दांचा वापर करणार असल्याचं चित्र आहे.

Tags:    

Similar News