सागरमाला प्रकल्पाला अनुदानाची प्रतिक्षा, अनेक प्रकल्प रखडले
केंद्र शासनाच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयने रायगड जिल्ह्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांची घोषणा केलेली आहे, या प्रकल्पांमध्ये रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता आहे. पर्यटन, पायाभूत उद्योग आणि अंतर्देशीय जलवाहतुकीची सांगड घालत या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे; मात्र, हे प्रकल्प पुर्णत्वास येण्यास आर्थिक पाठबळाची कमतरता सतावू लागली आहे. निधीची कमतरता यामुळे जिल्ह्यातील प्रमुख सागरमाला प्रकल्पांना विलंब होत आहे, त्याचबरोबर बंदरांच्या संशोधन आणि विकासामध्येही अनेक अडथळे निर्माण होत आहेत आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
0