#AshnaLidder : बिग्रेडियर लिड्डर यांच्या मुलीने ट्रोलिंगमुळे ट्विटर सोडले?

जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेल्या ब्रिगेडियर लिड्डर यांची १६ वर्षांची मुलगी सध्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या परखड मतांमुळे ट्रोल आर्मीने ट्रोल केल्याने तिने ट्विटर हँडल बंद केले आहे, अशी चर्चा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी होते, ते सांगणारा रिपोर्ट....

Update: 2021-12-11 09:22 GMT

१६ वर्षांची आशना लिडर, आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देतानाचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत....जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात आशनाचे वडील ब्रिगेडियर लखविंदर सिंह लीडर यांचेही निधन झाले…माध्यमांशी बोलताना तिने अत्यंत धैर्याने आपल्या वडिलांच्या निधानवर प्रतिक्रिया दिली आहे. आपले वडील आपले सगळ्यात चांगले मित्र होते अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. १७ वर्ष ते आमच्यासोबत होते, पण आता त्यांच्या चांगल्या आठवणींच्या आधारे आम्ही जगू असे तिने सांगितले आहे. पण सध्या सोशल मीडियावर आशनाने ट्रोलिंगमुळे आपले ट्विटर अकाऊंट डिलिट केल्याचे सांगितले जा आहे. काँग्रेसचे नेते नीरज भाटिया यांनी आशनाने योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केल्याने तिला ट्रोल करण्यात आल्याचा आरोप करत आशनाचे ट्विट शेअर केले आहे.

vo-2 चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी ट्विट करत १६ वर्षांच्या आशनाने दोन दिवसांपूर्वी आपले वडील गमावले, तिला आता आयटी सेल त्रास देत आहे. त्यामुळे तिला आपले ट्विट हँडल बंद करावे लागले. असे म्हटले आहे. आशनाने याआधीच्या आपल्या ट्विटमधून देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती, तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे ट्विट लाईक केले होते...असे म्हणत नवा भारत इतका भयानक आहे का, असा सवाल कापरी यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करुन आशनाने आपले ट्विटर अकाऊंट बंद केल्याचे सांगितले आहे. आशनाने सोशल मीडियावर तिची काही मतं व्यक्त केली होती, त्यानंतर तिला ट्रोल केले गेले, त्यामुळे आशनाने आपले ट्विट अकाऊंट बंद केले आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

तर दिल्लीतील आणखी एक पत्रकार अरविंद गुनसेकर यांनी तर उजव्या विचारसरणीच्या द्वेष पसरवणाऱ्या गुंडांनी तिला आपले ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यास भाग पाडले असे म्हटले आहे.

तर पी चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनीही लबाड देशभक्त आणि राष्ट्रवादी लोकांनी एका लहान मुलीला ट्रोल केल्यामुळे तिला ट्विट सोडावे लागले असे म्हटले आहे.

आशना लिड्डर कोण आहे?



 


आशना लिड्डरचे वडील ब्रिगेडिटर लखविंदर सिंग हे जनरल बिपिन रावत यांच्यासोबत होते. हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचेही निधन झाले. काही दिवसांपूर्वी आशनाच्या एका काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. इन सर्च ऑफ टायटल असे तिच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे. यावरुनच एवढ्या कमी वयात आशना अत्यंत प्रगल्भपणे विचार करते आणि ती स्वतंत्र विचारांची मुलगी असल्याचे दिसते. तरी सोशल मीडियावर तिने व्यक्त केलेल्या मतांमुळे तिला ट्रोल केले गेले आहे. आशनाने आपले ट्पविटर अकाऊंट का बंद केले हे सांगितले नसले त्यामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Tags:    

Similar News