चॅनलच्या स्टुडिओत भाजप प्रवक्त्याची ठोकून काढण्याची धमकी

Update: 2019-05-31 12:09 GMT

नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा सुरू असतांना टीव्ही ९ मराठी या चॅनलच्या स्टुडिओत पत्रकार आणि राजकीय नेत्यांची चर्चा सुरू होती. यावेळी शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं विविध विषय पुढे आले, त्यावर अँकर निखिला म्हात्रे हिने प्रश्न विचारायला सुरूवात केली. या चर्चेमध्ये पत्रकार म्हणून जयंत माईणकर, चंद्रकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, बँक संघटनेचे नेते विश्वास उटगी, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट उपस्थित होते. यावेळी पत्रकार जयंत माईणकर आणि भाजप प्रवक्ते शिरसाट यांच्या वाद झाला. अँकर निखिला हिने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त भाजप प्रवक्ते शिरसाट यांनी पत्रकार माईणकर यांना ठोकून काढलं पाहिजे, सुपारीबाज पत्रकार म्हणत धमकी दिली. याचा माईणकर यांच्यासह उटगी यांनीही चर्चेतच निषेध केला.

Full View

Similar News