Ground Report - पीक विम्यासाठी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट,शेतकऱ्यानेच केलं स्टिंग ऑपरेशन

चक्रीवादळाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांचे कर्मचारी कशाप्रकारे लुटत आहेत, हे दाखवणारा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांचा Exclusive ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2021-06-16 12:43 GMT

दोन तरुणांना एक शेतकरी पैसे देतोय आणि ते तरुण ते पैसे घेऊन निघण्याच्या तयारीत असताना त्यांना शासकीय अधिकारी अडवतात आणि त्यांची चौकशी केल्यानंतर समजते की ते विमा कंपनीचे कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी ते लाच घेत असल्याचे चौकशीत उघड होते. हे सर्व एका स्टिंग ञपरेशनमधून उघड झाले आहे. एका घोटाळ्याचे हे स्टिंग ऑपरेशन कुणी पत्रकार किंवा अधिकाऱ्याने केलेले नाही तर शेतकऱ्यानेच हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. या शेतकऱ्याला थेट हे पाऊल का उचलावे लागले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर त्याचे उत्तर असे की तौक्ते चक्री वादळामुळे राज्यभरातील शेतीचे मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील केळी पट्टा असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, यावल या भागात कापणीला आलेली केळी अक्षरशः जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शेकडो हेक्टर वरील कोट्यवधींच्या बागा भुईसपाट झाल्या. या नुकसानीचे पंचनामे झाले.

Delete Edit

पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम बजाज अलायन्स विमा कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत मार्फत सुरू झाले. पण पीक विमा मिळवण्यासाठी तसेच यादीत नाव टाकण्यासाठी, शेतकऱ्यांकडूनच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागण्याचा प्रकार घडला. अखेर मुक्ताईनगर तालुक्यातील करकी येथील प्रवीण महाजन या शेतकऱ्याने विमा कंपनीच्या प्रतिनिधींचं स्टिंग ऑपरेशन केलं.


विमा कंपन्या शेतकऱ्यांना चक्री वादळाची भरपाई मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याची तक्रार स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. यावेळी आमदार पाटील, तहसीलदार , पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मदतीने विमा कंपनीचा भांडा फोड केला.


शेतकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर विमा कंपनीच्या एरिया प्रमुखालाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. विमा कंपनी कोणत्याही शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करत नसल्याचा खुलासा केलाय. तसेच जे कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर विमा कंपनीही कारवाई करेल अशी सारवासारव त्यांनी केली.


एकीकडे शेतकरी सततच्या संकटांनी ग्रासला आहे. दुसरीकडे सरकारची मदत कधी मिळेल माहित नाही. अशात पीक विमा हाच आधार आहे. पोटाला चिमटा बसला तरी चालेल पण पीक विम्याचे पैसे भरण्याचे काम शेतकरी करतात. पण त्यातही आता तर असा भ्रष्टातचार होत असेल तर सरकारने कडक कारवाईची गरज आहे.

Full View

Tags:    

Similar News