नरेंद्र मोदींचा राजीव गांधीबाबतचा 'तो 'आरोप चुकीचा... माजी नौदल प्रमुखांचा खुलासा

Update: 2019-05-09 16:28 GMT

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बेरोजगारी, राफेलचा कथित घोटाळा, जीएसटी या मुद्द्यावरुन मोदींना कोंडीत पकडले असताना मोदींनी मात्र, आपला मोर्चा भुतकाळाकडं वळवला असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्यावर वारंवार टीका करत आहेत.

"तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली तरी त्यांचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणून संपलं," असं पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर मोदी यांनी राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना INS विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबियांना सुटीत सहलीला नेण्यासाठी केला. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असा आरोप नवी दिल्ली येथे झालेल्या सभेत केला होता.

मात्र, हा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा आरोप माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांनी फेटाळून लावला आहे.

राजीव गांधी आयएनएस विराटवर उपस्थित होते. मात्र, त्यावेळी ते सहलीसाठी नव्हे तर त्रिवेंद्रम नॅशनल गेम्स प्राइज डिस्ट्रीब्यूशन च्या कार्यक्रमात मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होते. तसंच लक्षद्वीप बेटाच्या विकासासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी ते तिथं आले होते. अशी माहिती एल. रामदास यांनी दिली आहे.

या संदर्भात रामदास यांनी एक पत्र काढले असून या पत्रात राजीव गांधी यांच्या अधिकृत शासकीय दौऱ्यात त्यांच्या पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य सदस्य नव्हते असं म्हटलं असून त्यावेळी खबरदारी म्हणून राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नीसाठी एका हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती असं या पत्रात म्हटलं असून या पत्रात मोदी यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे.

Similar News