Ground Report : कृष्णेला रौद्र रुप, भिलवली गाव पाण्याखाली

Update: 2021-07-24 15:47 GMT

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापुराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने या भागाला उध्वस्त केले होते. आताही त्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पुन्हा कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील भिलवडी या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने भुवनेश्वरवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी या वाड्यांचा संपर्क तुटला आहे. भिलवडी हे गाव जवळपास 80% पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी....

Delete Edit


केवळ 24 तासात तब्बल 30 फूट पाणी वाढल्याने भिलवडी परिसर पाण्याखाली गेला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातून जाणाऱ्या 25 मार्गांवर पुराचे पाणी आले आहे. जिल्ह्यातील 8 राज्य मार्ग तर 17 जिल्हा मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक खंडित झाली आहे. शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्याचे काम सुरू काम सुरू झाले असून लवकरच पर्यायी मार्ग सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.\

Full View

Tags:    

Similar News