Ground Report : निधी आला पण प्लॅन आला नाही, हॉस्पिटल २२ वर्षे रखडले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेचे एक प्रसुती हॉस्पिटल तब्बल २२ वर्षांपासून दुरूस्तीअभावी बंद आहे. लोकप्रतिनिधी म्हणतात निधी आला आहे, पण मग हॉस्पिटलचे काम का ऱखडले आहे याचा शोध घेणारा प्रसन्नजीत जाधव यांचा रिपोर्ट....

Update: 2022-08-10 14:41 GMT

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने अनेक वेळा करुन दाखवलं असे महानगरपालिकेचे बँनर देखील झळकवले आहेत. तरीदेखील मुंबईतील कामाठीपुरा येथील गौराबाई महिला प्रसतीगृह गेल्या २२ वर्षांपासून हे रुग्णालय बंद आहे. अनेक वर्ष शिवसेनेने नेमकं काय करून दाखवलं असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या तीन महिला महापौर होऊन गेल्या आहेत. अत्यंत जिव्हाळ्याचा असणाऱ्या महिलांच्या प्रश्नांकडे शिवसनेचे दुर्लक्ष तरी कसं झाले असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आरोग्य समितीचे अध्यक्षपद हे शिवसेनेच्या अनेक महिलांनी भूषवले आहे. त्यात स्थायी समितीच्या बैठकीत अनेक रुग्णालयांचे विषय मांडता येतात. मोडकळीस आलेल्या ह्या रुग्णालयाची इमारत कधीही कोसळू शकते, अशा स्थितीत आहे. आजूबाजूच्या परिसरात जीवितहानी होण्याचीही भीती व्यक्त केली जाते.

२०१९ मध्ये या रुग्णालयांच्या पुर्णबांधणीसाठी ५० कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला. निधी मंजूर होऊन ३ वर्षे झालेत तरीदेखील ह्या रुग्णालयाचे काम अद्यापही सुरु नाही. आम्ही या संदर्भात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधाला, पण या विषयावर त्यांना काहीच माहीती नसल्याने त्यांनी रुग्णालयाच्या संबंधित प्रश्नांवर बोलण्यास टाळलं. मग आम्ही आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुलताई पटेल यांच्याशी या महिला रुग्णालयाबाबत प्रश्न विचारला, त्यावर महानगरपालिकेच्या प्रशासनाने याबाबत लक्ष द्यावे, संबंधित महिला रुग्णालयाच्या परिस्थितीबद्दल मला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या सहायक आयुक्तांना आम्ही याबाबत विचारले तर रुग्णालयाच्या प्लानमध्ये काही चुका राहिल्याची कबुली त्यांनी दिली. आता निधी आणि पण प्लान नाही, या कारणामुळे या हॉस्पिटलचे काम रखडले आहे.


Full View

Tags:    

Similar News