Ground Report : पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाची कहाणी....

Update: 2021-09-01 14:52 GMT

चाळीसगावमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे किती भयंकर नुकसान झाले आहे याचा अंदाज अजून सरकार यंत्रणेला आलेला नाही. पण डोंगरी नदीला आलेल्या पुराने किती नुकसान झाले आहे याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.



चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावात राहणाऱ्या बागुल कुटुंबासाठी ती रात्री काळरात्र ठरली आहे. बागुल कुटुंब हे शेतातच घर बांधून राहते आहे. या घरातून दोन लहान मुलं, पती आणि सासू घरातून निघालो आणि 10 मिनिटात शेतातील पक्कं घर कोसळलं, असे अनित बागुल सांगत आहेत.




मोबाईलमुळे पती विश्वनाथ यांना जाग आली नसती तर सात महिन्यांच्या पोटातील बाळासह पती आणि सासू आम्ही घरात दबून मेलो असतो, अशी भीतीही त्या व्यक्त करतात. बागुल कुटुंब वाकडी गावातील शेतात घर बांधून राहत होते आणि शेतीही करत होते.



या पुरात जमवलेला पैसा, दागिने वाहून गेले. पुरामुळे घरासह शेतीही वाहून गेली, घरातील भांडी, धान्य आणि पशुधनही वाहून गेले आहे. केवळ अंगावरच्या कपड्यांसह हे कुटुंब आता जगण्यासाठी संघर्ष करत आहे. सरकारने मदत करावी अशी अपेक्षा आता त्यांना आहे.

Tags:    

Similar News