तालुकास्तरावर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी ३०० कोटी 

Update: 2019-06-21 07:16 GMT

महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 7 मार्च 2019रोजी जाहीर करण्यात आले असून त्यातून राज्याला जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे केंद्र बनवून 10 लाख कोटी रुपयांची गुतवणूक आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यातून 60 लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आल्याचेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

2019-2020 च्या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाकरिता पार्क तयार करण्यात येणार आहे. सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून 50 तालुक्यांमध्ये पार्कची निर्मिती प्रस्तावित.आहे. या योजनांसाठी 300 कोटी एवढा निधी राखून ठेवण्यात आला आहे. राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना दीर्घ मुदतीच्या कर्जाच्या व्याज अनुदानापोटी 376 कोटी 83 लाख मागील 4 वर्षांत वितरित करण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग घटकांना 10 टक्के अर्थसहाय्य म्हणून 180 कोटी 89 लाख एवढा निधी देण्यात आल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

-कोकणातील काजू प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारासाठी अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद

-महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रीलियन डॉलर म्हणजे रु. 70 लाख कोटी करणार

-लक्ष्यपूर्तीसाठी महाराष्ट्र आर्थिक‍ विकास परिषदेचे पुनरुज्जीवन

-चालू आर्थिक वर्षात रु. 20 कोटी एवढा निधी खीव

-मराठवाडा वॉटरग्रीडच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मंजुरी

-या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सिंगापूर कंपनी अर्थसहाय्य करण्यास तयार

 

Similar News